महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे उद्या एकाच मंचावर एकत्र येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार सोहळा उद्या म्हणजेच 24 एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे.
राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात सुरू असलेलं कोल्ड वॉर, तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन वारंवार भाजपकडून शिवसेनेला विचारण्यात येणारे प्रश्न आणि त्यातच मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याने भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.