दहावी-बारावी परीक्षांचे निकाल Results लांबणीवर?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल । महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं यंदाचं शिक्षण ऑनलाईन झालं मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. यामुळे अनेक विद्यार्थी नाराज होते. ऑफलाईन परीक्षा (Maharashtra state Board Exam Result) रद्द करण्यात याव्यात म्हणून काही विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. मात्र यानंतरही राज्यात बोर्डाच्या परीक्षा (State Board exam Result 2022) ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्यात. आता स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. अशात हा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. शिक्षकांनी मूल्यांकनावर बहिष्कार घातल्याने राज्यातील SSC, HSC परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे (SSC, HSC Results 2022 Likely To Be Delayed).

विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्या पूर्ण न झाल्यामुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका वेळेत तपासल्या न गेल्यास निकाल उशिरा लागण्याची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे. चार दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं, की दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल वेळेतच लागेल. मात्र, अशात आता हा निकाल लांबणीवर पडणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

विनाअनुदानित शाळांच्या महाराष्ट्र बोर्डाच्या अनेक शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेवर बहिष्कार घातल्याचं समोर आलं आहे. सरकारने 100% सरकारी अनुदान देण्याची मागणी पूर्ण करावी यासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे. MSBSHSE ने उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू केली होती आणि निकाल वेळेवर घोषित करायचा होता, मात्र आता शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *