![]()
महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल । सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Prices) जाहीर केले. सकाळी 6 वाजता जाहीर झालेले तेलाचे दर रविवारीही स्थिर राहिले. विशेष म्हणजे, रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ न झालेला 18 वा दिवस आहे. गेल्या वेळी 6 एप्रिल रोजी तेलाच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली होती, तेव्हापासून तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
गेल्या दोन आठवड्यांपासून कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे, परंतु कच्च्या तेलाच्या किंमती लवकर कमी न झाल्यास पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग होऊ शकते, असा अंदाज डीलर्सचा आहे.
चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर –
>> मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर
>> दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर
>> कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर