या कंपनीने ई-स्कूटर परत मागवल्या, वाहनांना वारंवार आग लागण्याच्या घटनांनंतर निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल । ओला इलेक्ट्रिकने 1,441 ई-स्कूटर परत मागवल्या आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वाहनांना आग लागण्याच्या घटना पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात २६ मार्चला लागलेल्या आगीच्या घटनेचा तपास सुरू असून प्राथमिक तपासात, एक वेगळी घटना असल्याचे समोर आले आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी कंपनी पुन्हा एकदा ई-स्कूटरची तपासणी करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ओला इलेक्ट्रिकने पुढे सांगितले की, या स्कूटर्सची आमच्या अभियंत्यांकडून चाचणी घेतली जाईल.

बॅटरी मानकांनुसारच

ओला इलेक्ट्रिकने सांगितले की, त्यांची बॅटरी सिस्टीम आधीपासूनच नियमांनुसार तयार करण्यात आली आहे. युरोपियन मानक ECE 136 व्यतिरिक्त, त्यांची भारतासाठी नवीन प्रस्तावित मानक AIS 156 साठी चाचणी केली गेली आहे.

हैदराबादस्थित EV कंपनी Pure EV ने ई-स्कूटरचे 2,000 युनिट्स परत मागवले आहेत. Pure EV स्कूटरला अलीकडच्या काळात तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये आगीच्या अनेक घटना समोर आली आहे. या घटनांमुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

याशिवाय जितेंद्र ईव्हीच्या 20 इलेक्ट्रिक स्कूटरला नुकतीच आग लागली होती. ओकिनावा आणि ओलाच्या ई-स्कूटर्सना आग लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही काळापूर्वी ओकिनावाने त्यांच्या 3000 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर रिकॉल केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *