Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर , जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२५ एप्रिल । देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज सलग 19 वा दिवस आहे, जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे, कारण याआधी 6 एप्रिलपर्यंत इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत होती. तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.

कच्च्या तेलाच्या किंमती
आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होताना दिसत आहे. नायमॅक्स क्रूड 2.40 डॉलरने घसरून प्रति बॅरल $99.67 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूडची किंमत आज $ 103.92 वर आहे आणि प्रति बॅरल $ 2.73 ने घसरली आहे. या किंमतींच्या आधारे सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत, जाणून घ्या

आज देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर काय?

मुंबई – पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर
दिल्ली – पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल – 96.67 रुपये प्रति लिटर
बेंगळुरू – पेट्रोल 112.78 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.21 रुपये प्रति लिटर
हैदराबाद- पेट्रोल 111.42 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.11 रुपये प्रति लिटर
अहमदाबाद – पेट्रोल 105.08 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.43 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर
कोलकाता- पेट्रोल 115.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर
सुरत – पेट्रोल 105.09 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.46 रुपये प्रति लिटर
पुणे – पेट्रोल 120.75 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 103.42 रुपये प्रति लिटर
लखनौ – पेट्रोल 105.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.88 रुपये प्रति लिटर
जयपूर- पेट्रोल 118.17 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 101.05 रुपये प्रति लिटर
कानपूर – पेट्रोल 105.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.70 रुपये प्रति लिटर
नागपूर – पेट्रोल 120.19 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 102.92 रुपये प्रति लिटर
इंदूर – पेट्रोल 118.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 101.22 रुपये प्रति लिटर
ठाणे- पेट्रोल 119.90 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 102.59 रुपये प्रति लिटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *