महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल । पुढच्या म्हणजेच मे महिन्यात तुम्हाला तुमची सावली (shadow) हरवलेली दिसेल. तुम्हाला तुमची सावली दिसणार नाही. तुम्हालाच काय तर कोणत्याही वस्तूची सावली दिसणार नाही. म्हणजेच तुम्हाला ‘झिरो शॅडो डे’चा (zero shadow day)अनुभव घेता येईल. या दिवसात सूर्य वेगवेगळ्या शहरांमध्ये दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान अगदी डोक्यावर असणार आहे. त्यामुळे यादरम्यान कोणत्याही वस्तूची सावली 90 अंशाच्या कोनात राहील. तुम्हाला यादिवशी तुमची सावली हरवल्याचं दिसून येईल. तुम्हालाही या शून्य (zero) सावलीचा थरार अनुभवता येऊ शकतो. ते अनुभवनं देखील अगदी सोपं आहे. एखादी वस्तू जमीनीवर सरळ उभी करा, ही वस्तू उभी केल्यास तुम्हाला शून्य सावलीचा थरार अनुभवता येईल.
तुमचं शहर आणि शून्य सावलीचा दिवस
3 मे – सावंतवाडी ते बेळगाव
4 मे – मालवण
6 मे – कोल्हापूर
13 मे पुणे, उस्मानाबाद
15 मे – मुंबई
19 मे – औरंगाबाद, जालना
24 मे – धुळे, जामनेर, निभोरा