महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल । बँकशी संबंधित तुमचे काही महत्त्वाचे काम असेल तर त्याचे आधीच नियोजन करा. कारण मे महिन्यात १० दिवस बॅंक बंद राहणार आहे.राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे त्यानुसार नियोजन करूनच बँकेमध्ये जा.शक्य असल्यास बॅंकेची कामे ऑनलाइन करा.दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.
मे महिन्यात कोणत्या दिवशी बॅंक बंद असणार आहे, याची यादी पाहूया.
१ मे : महाराष्ट्र दिन, कामगार दिवस आणि रविवार असल्यामुळे मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी बॅंकेला सुट्टी असणार
३ मे : रमजान ईद असल्याने यादिवशी बॅंक बंद राहील.
८ मे : रविवार असल्याने यादिवशी बॅंकेला साप्ताहिक सुट्टी असेल.
१४, १५ मे : शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्टी असल्याने यादिवशी बॅंक बंद राहील.
१६ मे : बुद्ध पौर्णिमा असल्याने यादिवशी बॅंकेला सुट्टी असणार आहे.
२२ मे : रविवार असल्याने यादिवशी बॅंकेला साप्ताहिक सुट्टी असेल.
२८, २९ मे : शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्टी असल्याने यादिवशी बॅंक बंद राहील.