महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२८ एप्रिल । महाराष्ट्रात बुधवारी सूर्यदर्शनालाच आगीचा लोळ अंगावर य़ेत होता. मध्यान्हाच्या आधीच हवेत भट्टी पेटली; ती सायंकाळपर्यंत आग ओकत होती. मुंबई, ठाणे, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रात दिवसभर उष्म्याचा प्रकोप होता. मुंबईत विक्रोळीमध्ये स्वयंचलित यंत्रणेनुसार तापमान ४२.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. डोंबिवलीत ४३.३, ठाण्यात ४१.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. पुण्यात तापमानाने ४१.३, ब्रह्मपुरीत ४५.१, जळगावात ४४, नाशिक ४१, मालेगावात ४३ अंश सेल्सिअसची पातळी गाठली होती.
विक्रोळी : ४२.२ अंश
कर्जत : ४५.८ अंश
डोंबिवली : ४३.३
ठाणे ४१.७ अंश
ब्रह्मपुरी : ४५.१ अंश
नागपूर : ४४.८ अंश
जळगाव : ४४ अंश
पुणे : ४१.३ अंश
कर्जत ४५.८, डोंबिवली ४३.३ अंश
पावसाची शक्यता
पुढील ४८ तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर पुढील पाच दिवस विदर्भाच्या काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली.