महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ एप्रिल । पुण्यात (Pune) सातारा रोडवर एसटीचा ब्रेक फेल झाल्यामुळे पाच ते सहा गाड्यांना धडक दिली आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पुण्यातील सातारा रस्त्यावर हॉटेल रविकांत जवळ हा झाला आहे. (Pune Latest Marathi News)
अधिक माहिती अशी, अचानक एसटीचा (ST) ब्रेक फेल झाल्यामुळे एसटीने पाच ते सात गाड्यांना धडक दिली, या अपघातात तिघेजण जखमी झाले. जखमींना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातमुळे सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी वाहतुक पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस (Police) दाखल झाले आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. त्यामुळे एसटी बस बंद असवस्थेत होत्या. बस आता पुन्हा सुरु झाल्या आहेत.