![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ एप्रिल । कमाॅडिटी बाजारात आज गुरुवारी २८ एप्रिल २०२२ रोजी सोने आणि चांदीमध्ये मोठी विक्री झाली. आज सोनं जवळपास २५० रुपयांनी स्वस्त झाले. सोन्याचा भाव ५१००० रुपयांखाली घसरला तो ५०८२८ रुपये इतका खाली आला. मागील दोन महिन्यातील सोन्याचा हा सर्वात कमी दर आहे. आज चांदीदेखील ८५० रुपयांनी स्वस्त झाली असून चांदीचा भाव ६४ हजार ५०० रुपयांखाली आला आहे.
सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींवरील दबाव कायम आहे. सध्या मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजवर १० ग्रॅम सोन्याचा भाव ५०८२८ रुपये इतका खाली आला आहे. त्यात २५० रुपयांची घसरण झाली. गेल्या दोन महिन्यातील हा सर्वात कमी दर आहे. एक किलो चांदीचा भाव ६४६९० रुपये इतका घसरला असून त्यात ६०० रुपयांची घसरण झाली आहे.
https://twitter.com/IBJA1919/status/1519567158262452224?s=20&t=0EnM_neGIlo4QrXsb-md8w