महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ एप्रिल । आयपीएलचा यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी जणू एक वाईट स्वप्न आहे. मुंबईचे आतापर्यंत 8 सामने खेळले असून एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. 8 पराभव स्विकारल्यानंतर मुंबईसाठी प्लेऑफचे दरवाजेही बंदी झाले आहेत. तर आता अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या टीममध्ये कधी संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान मुंबई इंडियन्स आगामी 9 व्या सामन्यासाठी टीममध्ये बदल करण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सने स्वतः याचे संकेत दिले आहेत.
मुंबईच्या फ्रेंचायझीने सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीयोमध्ये अर्जुन गोलंदाजीची प्रॅक्टिस करताना दिसतोय. या व्हिडीयोच्या कॅप्शनमध्ये मुंबई इंडियन्सने लिहिलं आहे की, परफेक्ट फॉलो थ्रू अॅक्शन सोबत, अर्जुन तेंडुलकर लय भारी!
Charged with a perfect follow through action! ⚡
Arjun, लय भारी रे 🔥#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/BVp5DTtgrY
— Mumbai Indians (@mipaltan) April 27, 2022