सगळ्यात वेगवान उमरान : 155 किमी/ प्रतितास वेगाने गोलंदाजी

Spread the love

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी। दि.२८ एप्रिल । यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत असलेला २२ वर्षीय गोलंदाज उमरान मलिक सामन्यागणिक लक्षवेधी कामगिरी करत आहे. त्यामुळे तो आपल्या शैलीदार आणि आक्रमक खेळीमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने ९१ पेक्षा अधिक टक्के १४० किमी/ प्रतितासाच्या वेगाने यंदा चेंडू टाकले. त्यामुळेच तो टीम इंडियासाठी वेगवान आणि आक्रमक असा गोलंदाज मानला जात आहे. आयपीएलच्या माध्यमातून युवा गोलंदाज निश्चितपणे भारतीय संघातील आपले स्थान निश्चित करू शकतो. कारण या स्पीड स्टार गोलंदाजाने बुधवारी रात्री १५२.८ च्या भरधाव याॅर्करवर गुजरात संघाच्या वृद्धिमान साहाच्या त्रिफळा उडवण्याचा पराक्रम गाजवला.

यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू
153.90 फर्ग्युसन पंजाब
153.30 उमरान हैदराबाद
153.10 उमरान हैदराबाद
152.80 उमरान हैदराबाद
152.60 फर्ग्युसन पंजाब
152.60 उमरान हैदराबाद

किमी/प्रतितास वेगाने भारतीय संघाच्या श्रीनाथने १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिका दाैऱ्यावर चेंडू टाकले होते. तो भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला होता.

फक्त २८% चेंडूंची स्पीड १३० पेक्षा कमी राहिली
वेगवान गोलंदाज उमरान मलिकने यंदाच्या लीगमध्ये ९१% पेक्षा अधिक चेंडू हे १४० किमी/ प्रतितासाच्या वेगाने टाकले आहेत. फक्त २८ टक्के चेंडूंचा वेग हा १३० किमी/ प्रतितास असा कमी नोंद झाला आहे. सत्रातील सहापैकी चार वेगवान चेंडू त्याने टाकले.

१५५ किमी/ प्रतितास वेगाने गोलंदाजी : उमरान
याेग्य लाइन व लेंथवर गोलंदाजी करत बळीचा प्रयत्न असतो. एकाच दिवशी १५५ किमी/प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी करणार असे उमरानने सांगितले.

किमी/प्रतितासाच्या वेगाने राजस्थान संघाकडून शाॅन टेटने २०११ मध्ये दिल्लीविरुद्ध सर्वात वेगवान चेंडू टाकला.

उमरानपाठाेपाठ या त्रिकुटाच्या चेंडूंची फलंदाजांना धडकी
बुमराह 153.26 kmph
शमी 153 kmph
नवदीप 152.85 kmph

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *