राणा दाम्पत्याचा मुक्काम कारागृहातच ; जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ एप्रिल । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार करत खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) अमरावतीहून मुंबईत आले. त्यानंतर झालेल्या संघर्षानंतर राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. राणा दाम्पत्याच्या विरोधात राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 एप्रिलपासून राणा दाम्पत्य हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र, आज जामीन अर्जावर होणारी सुनावणी उद्यावर ढकलली आहे.

न्यायालयाने आधीच स्पष्ट केलं होतं की, शुक्रवारी शक्य झालं तर सुनावणी घेण्यात येईल. मात्र, न्यायालयात आधीच अनेक प्रकरणांची सुनावणी आहे. त्यामुळे आज सुनावणी शक्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे. आता राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. उद्या दुपारी 3 वाजता राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *