Today Petrol Diesel price : इंधन दर उच्चांकी पातळीवर स्थिर ; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी। दि.३० एप्रिल ।पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Petrol Diesel price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सहा एप्रिल पासून ते 30 एप्रिल असे सलग 25 दिवस इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. एकीकडे कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे असताना देखील सलग 25 दिवस देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने हा सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. त्यापूर्वी 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेलचे दर या काळात प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षा अधिक महाग झाले. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज राजधांनी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर (Petrol Price in Delhi Today) 105.41 रुपये तर डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईमध्ये (Petrol Price in Mumbai Today) पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर तर डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर आहे.

पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जाहीर करण्यात आलेल्या नव्या दारानुसार राज्यात देखील इंधनाचे दर स्थिर आहेत. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 121.13 रुपये आहे तर डिझेलचा दर 103.79 रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.40 रुपये असून, डिझेल प्रति लिटर 103.73 रुपये लिटर आहे. राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये असल्याचे पहायला मिळत आहे. परभणीत पेट्रोल, डिझेलचे दर अनुक्रमे 123.51 आणि 106.10 रुपये लिटर आहे. तर पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 120.20 रुपये लिटर असून, डिझेल 103.10 लिटर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *