महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी। दि.३० एप्रिल । अवघ्या महाराष्ट्राच्या डोक्यावर सूर्य जणू आग ओकतोय. विदर्भात तर पाऱयाने पंचेचाळिशी पार केली आहे. चंद्रपुरात आज 46.4 अंश सेल्सियस एवढे तापमान होते. यंदाच्या उन्हाळय़ातील हे सर्वाधिक तापमान ठरले असून जगातील सर्वात उष्ण शहर म्हणून चंद्रपूर पाचव्या क्रमांकावर आहे.
शुक्रवारी विदर्भातील पाच जिह्यांत तापमान 45 च्या वर नोंदविले गेले. उत्तर प्र्रदेशातील बांदा हे शहर देशात सर्वांत उष्ण ठरले. तेथे 47.4 अंश सेल्सियस तापमान होते.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून 36 ते 38 अंश सेल्सियसपर्यंत डोलणारा पारा आज मात्र 34 वर स्थिरावला होता. तरीही मुंबईतील उकाडा काही कमी झाला नव्हता आणि मुंबईकरांची घामापासून सुटका झाली नव्हती.