औरंगाबादेतील सभेपूर्वी खासदार इम्तिजाय जलील यांच्याकडून राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं आमंत्रण, म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी। दि.३० एप्रिल । महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होत आहे. या सभेसाठी आज ते पुण्यावरून औरंगाबादच्या दिशेने रवाना देखील होत आहेत. राज ठाकरेंच्या या सभेबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. शिवाय, या सभेच्या अगोदर देखील परवानगी नाट्य रंगल्याचं दिसून आलं होतं, अखेर ही सभा नियम आणि अटींसह होणार आहे. औरंगाबादेतील राजकीय परिस्थिती पाहता, राज ठाकरे नेमकं काय बोलतील आणि त्याचे काय पडसाद उमटू शकतात, याबाबत देखील चर्चा सुरू आहे. दरम्यान, औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना या बहुचर्चित सभेअगोदर इफ्तार पार्टीचे आमंत्रण दिले आहे.

“राज ठाकरे यांची इथे सभा होणार आहे, मी त्यांना एवढच सांगू इच्छितो की १ तारखेला तुमची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. साडे सात वाजता तुमची सभा आहे, त्या सभेपूर्वी हिंदू-मुस्लीम एकतेसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन इफ्तार करु, यामधून एक चांगला संदेश जाईल.” असं म्हणत जलील यांनी या इफ्तार पार्टीत सहभागी होण्याचं राज ठाकरे यांना आमंत्रण दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *