वेगाचा बादशाह उमरान मलिक ; चेन्नईविरुद्ध सामन्यात त्यानं दाखवून दिलं, मोडला विक्रम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.३ मे। सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकनं (Umran Malik) आपल्या वेगानं भल्याभल्या फलंदाजांना थक्क केलं आहे. यंदाच्या हंगामात उमरान मलिकनं अनेकदा फास्टेस्ट डिलिव्हरी ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकले आहेत. चेन्नईविरुद्ध सामन्यात त्यानं आयपीएल 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याची गोलंदाजी पाहून प्रेक्षक हैराण झाले आहेत.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात उमरान मलिकनं आतापर्यंत सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. चेन्नईच्या डावाती दहाव्या षटकात सनरायडर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसननं उमरान मलिकला गोलंदाजीसाठी बोलावलं. या षटकात उमरान मलिकनं चक्क 154 किमी प्रतितासानं चेंडू टाकला. यावर ऋतुराज गायकवाडनं पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा चेंडू ऋतुराजच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागून पाठीमागं चौकार गेला. उमरान मलिकनं टाकलेला या चेंडूनं मैदानात उपस्थित असलेल्या खेळाडूंसह प्रेक्षकांचंही लक्ष वेधून घेतलं.

आयपीएल 2022 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम गुजरात टायटन्सचा गोलंदाज लॉकी फॉर्ग्युसनच्या नावावर होता. त्यानं चेन्नईविरुद्ध सामन्यात 153.9 किमी प्रतितासानं चेंडू टाकला होता. परंतु, आज उमरान मलिकनं 154 किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकत लॉकी फॉर्ग्युसनला मागे टाकलं. त्यानं या हंगामात अनेकदा 150 किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी केली आहे.

पर्पल कॅपच्या शर्यतीत उमरान मलिक तिसऱ्या क्रमांकावर
आयपीएलचा पंधरावा हंगाम उमरान मलिकसाठी चांगला ठरला आहे. या हंगामात त्यानं 15 विकेट्स घेतल्या. दरम्यान, एका सामन्यात त्यानं पाच विकेट्स घेतल्या आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *