मे महिन्यात तापमान कमी होण्याचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.३ मे। मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन तापमान कमी होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.एक दिलासादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एप्रिल महिन्यापेक्षा मे महिन्यात तापमान कमी राहाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मे महिन्यात तब्बल 109 टक्के अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस पडल्यास वातावरण थंड होऊन नागरिकांचा तापमानापासून बचाव होऊ शकतो. सध्या राज्यात तापमानाने कहर केला असून, अनेक जिल्ह्यात पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *