महाराष्ट्र २४; ऑनलाईन:.मुंबई : कोरोनाबाधितांचे वाढते आकडे पाहता मुंबई आणि पुण्यातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढू शकतो. राज्य मंत्रिमंडळाच्या काल (7 एप्रिल) झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. मंत्रिमंडळ बैठकीत दोन प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पहिला प्रस्ताव म्हणजे केशरी रेशन कार्डधारकांना अनुदानित अन्नधान्य पुरवलं जाईल. तर शिवभोजन थाळी योजना पुढील तीन महिने तालुका स्तरावर कायम राहिल असा दुसरा प्रस्ताव. यावरुन लॉकडाऊन 15 एप्रिल रोजी उठणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
इतिहासात पहिल्यांदाच, राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काही कॅबिनेट मंत्री हे त्यांच्या शासकीय निवास्थान ‘वर्षा’वर उपस्थित होते. तर काही जण मंत्रालय आणि उर्वरित आपापल्या मतदारसंघातून बैठकीला हजर होते.
दरम्यान, सार्वजनिक धार्मिक उपक्रमांवर बंदी यासह आगामी 15 मे पर्यंत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिगटाने केली आहे. यावर पंतप्रधान मोदी अंतिम निर्णय घेणार आहेत.