महाराष्ट्र २४; ऑनलाईन :नवी दिल्ली : देशातील कोरोना व्हायरस संक्रमित लोकांनी 5 हजाराचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत जवळपास 401 लोक बरे झाले आहेत, तर 149 लोकांचा झाला आहे मृत्यू झाला आहे. गेल्या 12 तासांत देशभरात 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात.
कोरोना व्हायरस मूळे देशपातळीवर असलेल्या लॉकडाऊनसंदर्भात आगामी 11 किंवा 12 एप्रिल ला केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची वाढता संख्या लक्षात लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, सार्वजनिक धार्मिक उपक्रमांवर बंदी यासह आगामी 15 मे पर्यंत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिगटाने केली आहे. यावर पंतप्रधान मोदी अंतिम निर्णय घेणार आहेत.