देशामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४; ऑनलाईन :नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाग्रस्तांची आतापर्यंतची आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. त्यानुसार, आतापर्यंत 5194 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 149 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 401 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जगभरात 75,000 पेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू युरोपात झाले आहेत.

राज्यानुसार कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीबाबत बोलायचे झाले तर देशभरातील सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. येथे 868 लोक कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी 56 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. तर 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेशमध्ये 266, अंदमान निकोबारमध्ये 10, अरूणाचल प्रदेशमध्ये एक, आसाममध्ये 26, बिहारमध्ये 32, चंदिगढमध्ये 18, छत्तीसगढमध्ये 10, दिल्लीमध्ये 576, गोव्यात 7, गुजरातमध्ये 165, हरियाणामध्ये 90, हिमाचल प्रदेशमध्ये 13, जम्मू-काश्मिरमध्ये 116, झारखंडमध्ये 4, कर्नाटकात 175, केरळमध्ये 327, लदाखमध्ये 14, मध्यप्रदेशात 229, मणिपूर मध्ये दोन, मिझोरम मध्ये एक, ओदिशामध्ये 42, पद्दुचेरीमध्ये पाच, पंजाबमध्ये 91, राजस्थानमध्ये 288, तामिळनाडूमध्ये 621, तेलंगणामध्ये 364, त्रिपुरामध्ये एक, उत्तराखंडमध्ये 31, उत्तरप्रदेशमध्ये 305 आणि पश्चिम बंगालमध्ये 91 रूग्ण कोरोना बाधित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *