महाराष्ट्र २४; ऑनलाईन : पुणे : राज्यात कोरोनाग्रस्तांच्या आकडा हजार पार गेल्या आहे. सर्वाधिक धोका हा मुंबई पुण्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत 149 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यातच धक्कादायक बाब म्हणजे पुण्यात आज सकाळी कोरोनागमुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयातील 3 जणांचा तर नायडू आणि नोबेलमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकट्या पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे. पुणे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.