सीईटी परीक्षांचे वेळापत्रक पुन्हा बदलले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.३ मे । जेईई परीक्षांमुळे एमएचटी सीईटीच्या परीक्षा ऑगस्टमध्ये ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता 1 जून ते 15 जुलैदरम्यान राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये होणार्‍या परीक्षांसाठी उच्चशिक्षणांतर्गत अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रकही ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सीईटी परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आले असून, सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.

देशपातळीवरील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत घेण्यात येणार्‍या जेईई (मेन) या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. जेईई व एमएचटी सीईटीच्या परीक्षांच्या तारखा एकसमान असल्याने सीईटी सेलने एमएचटी सीईटी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करत ती ऑगस्टमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र राज्यातील विविध विद्यापीठांच्या परीक्षा 1 जून ते 15 जुलैदरम्यान होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितास्तव सीईटी सेलकडून अंदाजित वेळापत्रकात पुन्हा सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार आता उच्चशिक्षण व तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या परीक्षा 2 ते 25 ऑगस्टदरम्यान घेण्यात येणार आहेत.

तर एमएचटी सीईटीची परीक्षा 5 ते 20 ऑगस्टदरम्यान घेण्यात येणार आहेत. मात्र कला शिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणारी सीईटी परीक्षा 12 जून रोजीच होणार आहे. सीईटी परीक्षांसाठी करण्यात आलेल्या नोंदणीला विद्यार्थ्यांनी यंदा चांगला प्रतिसाद देत तब्बल 9 लाख 25 हजारांपेक्षा अधिक नोंदणी केली आहे.

तंत्रशिक्षण विभाग

एमएचटी सीईटी पीसीएम ग्रुप – 5 ते 11 ऑगस्ट
पीसीबी ग्रुप – 12 ते 20 ऑगस्ट
एमबीए / एमएमएस 23 ते 24 आणि 25 ऑगस्ट
एमसीए 4 आणि 5 ऑगस्ट
बी एचएमसीटी 21 ऑगस्ट
एम एचएमसीटी 2 ऑगस्ट
एम आर्च 2 ऑगस्ट
बी प्लॅनिंग 4 ऑगस्ट

उच्चशिक्षण विभाग

बीए- बीएड, बीएस्सी बीएड (एकात्मिक) 4 ऑगस्ट
बीपीएड 2 ऑगस्ट
विधी 3 वर्षे 3 व 4 ऑगस्ट
बीएड 21 व 22 ऑगस्ट
बीएड- एमएड(एकात्मिक) 2 ऑगस्ट
एमएड 2 ऑगस्ट
एमपीएड 21 ऑगस्ट
विधी 5 वर्षे 2 ऑगस्ट

कलाशिक्षण विभाग

दृश्यकला पदवी व डिझाईन 12 जून

वैद्यकीय विभाग

भौतिकोपचार 11 सप्टेंबर
व्यवसायोपचार 11 सप्टेंबर
स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी 11 सप्टेंबर
प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स 11 सप्टेंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *