‘मॉन्स्टर’ सिक्स ; लिव्हिंगस्टोनने मारला 117 मीटर लांब, शमी ‘हैराण’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.४ मे । IPL 2022 GT vs PBKS: गुजरात टायटन्स (GT) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात आयपीएलचा 48 वा सामना खेळला गेला. मयंक अग्रवालच्या टीम पंजाबने हा सामना ८ विकेट ने जिंकला. सामन्यात पंजाबच्या गोलंदाजीपासून ते फलंदाजीपर्यंत गुजरात संघावर वर्चस्व गाजवले. त्याचवेळी इंग्लिश फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन पुन्हा एकदा चर्चेत आला. लियाम लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शमीच्या 16व्या षटकात तर कहरच केला. षटकातील पहिला चेंडूवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार मारला.(Liam Livingstone 117 Metre Six Against GT leaves Shami Mayank Dumbstruck IPL Record Six In History)

शमीच्या 134.7kph इन-एंगल लेन्थ बॉल वर लिव्हिंगस्टोनने त्याचा पुढचा पाय पुढे नेला आणि त्याची बॅट डीप स्क्वेअर लेगवर फिरवली आणि चेंडू 117 मीटर लांब असा मारला. आयपीएल 2022 मधील हा आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार होता.

लियाम लिव्हिंगस्टोनचा T20 रेकॉर्ड चांगला आहे. या सामन्यापूर्वी त्याने 176 सामन्यात 29 च्या सरासरीने 4373 धावा केल्या आहेत. त्यात 2 शतक आणि 26 अर्धशतकाचा समावेश आहे. यावरून त्याच्या आक्रमक फलंदाजीचा अंदाज लावता येतो. त्याने आत्तापर्यंत 250 षटकार मारले आहेत. लिव्हिंगस्टोनचा हा आयपीएलचा तिसरा हंगाम आहे. 2019 मध्ये त्याला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली तर 2021 मध्ये फक्त 5 सामने खेळला. चालू हंगामात त्याने 10 सामने खेळले आहेत.आणि 33 च्या सरासरीने 293 धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *