महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.४ मे । भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर जारी केले आहेत. जवळपास महिन्याभरापासून देशात पेट्रोल (Petrol Price) -डिझेलचे दर (Diesel Price) स्थिर आहेत. यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती.
इंडियन ऑईलनं जारी केलेल्या लेटेस्ट दरांनुसार, राष्ट्रीय राजधानीत एक लिटर पेट्रोलची किंमत (Petrol Price) 105.41 रुपये असून डिझेल (Diesel Price) 96.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत.
इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई 120.51 104.77
दिल्ली 105.41 96.67
चेन्नई 110.85 100.94
कोलकाता 115.12 99.83