महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.४ मे । आयपीएलचा पंधरावा हंगाम आता रोमांचक स्थतीत पोहचला आहे. या हंगामातील पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. याशिवाय, पर्पल कॅपच्या शर्यतीतही रंग चढताना दिसत आहे. आयपीएल 2022 ची पर्पल कॅप राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज युजवेंद्र चहलच्या डोक्यावर सजली आहे. तो या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. या मोसमात युजवेंद्रनं आतापर्यंत 40 षटके टाकली आहेत. यामध्ये त्यानं 15.31 च्या सरासरीनं 19 विकेट्स घेतले आहेत घेतले आहेत. यादरम्यान, त्याचा इकोनॉमी रेट 7.27 होता.
युजवेंद्र चहला या गोलंदाजांचं आव्हान
पर्पल कॅपच्या यादीत युजवेंद्र चहल अव्वल स्थानी असला तरी, त्याला दिल्ली कॅपिटल्सचा कुलदीप यादव, पंजाब किंग्जचा कागिसो रबाडा आणि सनरायजर्स हैदराबादचा टी नटराजनचं खडतर आव्हान आहे. या तिन्ही गोलंदाजाच्या खात्यावर प्रत्येकी 17-17 विकेट्स घेतल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा उमेश यादव आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वानिंदू हसरंगा हे देखील पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत. दोन्ही गोलंदाजांनी यंदाच्या हंगामात 15-15 विकेट घेतल्या आहेत.
आयपीएल 2022 पर्पल कॅपची यादी-
क्र . गोलंदाज सामना विकेट बॉलिंग एवरेज इकनॉमी रेट
1 युजवेंद्र चहल 10 19 15.31 7.27
2 कुलदीप यादव 9 17 15.82 8.23
3 कगिसो रबाडा 9 17 8.27 16.05
4 टी नटराजन 9 17 17.82 8.65
5 उमेश यादव 10 15 19.06 7.15