पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘अबकी बार, १०० पार’ – आमदार महेश लांडगे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.४ मे । पिंपरी-चिंचवड पालिकेची सत्ता पुन्हा भाजपाच्या ताब्यात येणार आहे. त्यादृष्टीने भाजपाचे कार्यकर्ते केव्हापासूनच तयारीला लागले आहेत. ‘अबकी बार, १०० पार’ ही आमची यंदाची घोषणा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी आज(बुधवार) व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिला. त्यामुळे पालिका निवडणुकांविषयी होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

पत्रकारांशी बोलताना आमदार लांडगे म्हणाले, सहा महिन्यांपेक्षा जास्तकाळ प्रशासक ठेवता येणार नाही, अशी संविधानात तरतूद आहे. तरीही राज्यातील अनेक महापालिकांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू होता. आता सर्वोच्च्य न्यायालयानेच आदेश दिल्याने निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. शहरात एकूण सहा मंडल असून या मंडल पदाधिकाऱ्यांची संख्या ५५० आहे. जिल्हा कार्यकारिणी १५० जणांची आहे. शहरात एकूण ३५३ शक्ती केंद्रप्रमुख आणि १ हजार ३०८ बूथप्रमुख आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पालिका निवडणुकीत निश्चितपणे यशस्वी होणार आहोत, असेही लांडगे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *