पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.४ मे ।  पिंपरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसा निमित्त  सिद्धार्थ बनसोडे यांनी 6 रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. यावेळी आमदार बनसोडे यांना शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक यांनी बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गेली 2 वर्ष कोव्हिडच्या कठीण काळात आमदार बनसोडे यांनी वाढदिवस साजरा न करता त्याऐवजी जनसामान्य लोकांना मदत करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते.

परंतु आज सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, नगरसेवक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, उद्योग क्षेत्रातील मान्यवर यांनी आमदार बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कविता आल्हाट, नगरसेवक शाम लांडे, राजु  मिसाळ ,डब्बू आसवानी, प्रसाद शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शुभेच्छुकांचे आभार व्यक्त करताना आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, वाढदिवसानिमित मला कार्यकर्ते, मित्र मंडळी, नगरसेवक विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी प्रत्यक्ष येऊन फोन मेसेजद्वारे, सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. त्या सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *