‘राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी क्षमता होती पण…’ ; संजय राऊत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ मे । देशात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा व्यंगचित्रकार पुन्हा निर्माण व्हावा, अशी आमची इच्छा आहे. तो देशातील एकाधिकारशाही आणि मनमानी कारभारावर आसूड ओढेल, अशी आम्ही नेहमी मनोमन प्रार्थना करतो. ज्यांच्यामध्ये ही क्षमता होती असे आम्हाला वाटायचं त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरु केले आहे, अशी खोचक टिप्पणी करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Shivsena leader Sanjay Raut takes a dig at MNS chief Raj Thackeray)

बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्राच्या फटकाऱ्यांनी कोणालाही सोडले नाही. आपला कुंचला आणि वाणीच्या जोरावर बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात आणि देशात सत्तापरिवर्तन केले. बाळासाहेब ठाकरे हे प्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून पुढे आले. त्यांना कोणत्याही भाडोत्री भोंग्याची गरज लागली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्र कला पुढे जाईल होती, असे आम्हाला वाटले होते. पण दुर्दैवान भाजपने त्या व्यंगचित्रकलेचा गळा घोटला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

तसेच मनसेने सुरु केलेले भोंग्याचे राजकारण हिंदू समजावारच बूमरँग झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. भोंग्याच्या राजकारणामुळे कालपासून अनेक मंदिरांमध्ये काकड आरती झाली नाही. त्यामुळे अनेक हिंदू नाराज झाले आहेत. मशिदींवरील भोंग्यावरून सुरु झालेले राजकारण हे आता हिंदुंच्या गळ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे, अशी टिप्पणीही संजय राऊत यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *