महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ मे । अदानी पॉवरला जानेवारी – मार्च तिमाहीत ४,६४५ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षातील मार्च तिमाहीच्या तुलनेत त्यात अनेक पटीने वाढ झाली आहे. जानेवारी – मार्च २०२१मध्ये अदानी पॉवरला केवळ १३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीच्या उत्पन्नात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन तो १३,३०८ कोटी रुपयांवर गेला आहे. गेल्या तिमाहीत याच कालावधीत ६,९०२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. २०२१-२२ या संपूर्ण आर्थिक वर्षात अदानी पॉवरला ४९११.५८ कोटी रुपयांचा एकत्रित नफा झाला होता. २०२०-२१ मध्ये तो १२६९.९८ कोटी रुपये होता.