महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ मे । जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. दिल्ली, मुंबईसह देशातील चार महानगरे आणि प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
वास्तविक, मुख्य आर्थिक सल्लागारांनी गेल्या महिन्यात एका निवेदनात म्हटले होते की, जोपर्यंत क्रूडची किंमत प्रति बॅरल डॉलर 110 पेक्षा कमी आहेत, तोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत. कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलरच्या वर राहिल्यास त्याचा भार सरकार, तेल कंपन्या आणि ग्राहकांना मिळून उचलावा लागेल. अशा परिस्थितीत आज जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत 110 डॉलरच्या वर पोहोचल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता बळावली आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-
दिल्ली पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर