Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ; चांदीही महागली, चेक कर नवे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.९ मे । मागील आठवड्यापर्यंत सोन्यात सतत घसरण (Gold Price Today) होताना दिसत होता. मात्र आता ऐन लग्नसराईत मागणी वाढल्याने सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) वाढ होताना दिसत आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सकाळच्या व्यवहारात सोन्याचा भाव 51 हजारांच्या वर तर चांदीचा भाव 62 हजारांच्या वर गेला आहे.

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोमवारी सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 7 रुपयांनी किरकोळ वाढून 51,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. यापूर्वी सोन्याचा व्यवहार 51,259 रुपयांपासून सुरू होता, परंतु खरेदी आणि मागणी वाढल्याने लवकरच सोन्याची फ्युचर्स किंमत 0.01 टक्क्यांनी वाढून 51,350 रुपयांवर पोहोचली. गेल्या सलग सत्रात सोन्याच्या दरात घसरण झाली होती.

चांदीच्या दरातही वाढ

चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज तेजी दिसून येत आहे. एमसीएक्सवर आज सकाळच्या व्यवहारात चांदीचा भाव 52 रुपयांनी वाढून 62,600 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 62,450 रुपयांवर सुरू होता, परंतु मागणी आणि खरेदी वाढल्याने लवकरच त्याची किंमत 0.08 टक्क्यांनी वाढून 62,600 वर पोहोचली.

जागतिक बाजारात सोने खाली

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. आज सकाळी अमेरिकन बाजारात सोने 0.29 टक्क्यांनी घसरून 1,876.05 डॉलर प्रति औंस झाले. मात्र, याउलट चांदीच्या दरात किंचित वाढ झाली. आज सकाळच्या व्यवहारात चांदी 0.6 टक्क्यांच्या वाढीसह 22.3 डॉलर प्रति औंसवर विकली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *