LPG Cylinder : गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर पंतप्रधानांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.९ मे । वाढत्या महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरड मोडलं आहे. भाज्यांपासून ते तेलापर्यंत सर्व वस्तंचे भाव वाढताना दिसत आहेत. खाद्य तेल, (Edible Oil) पेट्रोल-डिझेलसह (Petrl Diesel Rate) एलपीजी गॅस सिलेंडरचे (LPG Gas Cylinder) भावही वाढले आहेत. गॅल सिलेंडरचे दर वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्यावर वाढलेल्या महागाईवरून हल्ला चढवला होता.

पंतप्रधान मोदी यांच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये मोदी यांनी म्हटलं होतं की, आपण घरात असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरला हात जोडून नमस्कार करायला हवा, असं म्हटलं होतं. दोन दिवसांपूर्वीच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेल्या महागाईचं कारण देत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसतात. अशात पंतप्रधानांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा आहे. या व्हिडीओमध्ये मोदी त्या काळाचा संदर्भ देत आहेत जेव्हा काँग्रेस सरकारने सांगितले होते की, प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात ठराविक प्रमाणात गॅस सिलेंडर दिले जातील आणि ज्यांना मर्यादेपेक्षा जास्त सिलेंडर हवे असतील त्यांना जास्त पैसे द्यावे लागतील. या व्हिडीओमध्ये मोदी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर गॅस सिलेंडरचे दरवाढीवरून निशाणा साधला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये महागाईबाबत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, ‘तुम्ही महागाईमुळे मरत असाल तरी सरकारला त्याची पर्वा नाही.’ दरम्यान, शनिवारी 7 मे रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (14.2 किलो) किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *