तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात छत्रपतींच्या वारसांना प्रवेश नाकारला ; राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.११ मे । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरु असणाऱ्या घडामोडी नेमक्या कधी कोणतं वळण घेतील याचा काही नेमच नाही. सध्या अशीच धक्कादायक आणि विचार करायला भाग पडणारी घटना समोर आली आहे. जिथं खासदार, छत्रपती संभाजीराजे भोसले यांना तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्यामुळं तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. (sambhaji raje bhosale )

मंगळवारी तुळजाभवानी मंदिरात गेलं असता छत्रपती संभाजीराजे यांना नियमांची यादी दाखवत गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं. यानंतर जे घडलं त्याचे पडसाद आता राज्यातून आणि संभाजीराजे समर्थकांमधून उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मंदिराचं आणि देवीचं महत्त्वं पाहता हे पावित्र्य अबाधित रहावं आणि देवस्थळी कोणत्याही वादाची ठिणगी पडू नये, यासाठी संभाजीराजे मुखदर्शन घेऊनच मंदिर परिसरातून निघाले. पण, हे प्रकरण इथंच थांबलं नाही.

तिथं राजे मंदिरातून निघाले आणि इथं मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते, समर्थक प्रचंड आक्रमक झाले. संभाजीराजेंना मंदिर प्रशासनानं दिेलेली वागणूक संतापजनक असून, तहसीलदार आणि संबंधिक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीची त्यांनी केली.

‘जय भवानी, जय शिवाजी या नावानं महाराष्ट्राची सत्ता बदलते, पण भवानीदेवीच्या मंदिरात छत्रपतींच्या वंशजानांच प्रवेश नाकारला जातो तर, इथं सर्वसामान्यांना कशी वागणूक मिळत असेल’, असा संतप्त सूर समर्थकांनी आळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *