महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.११ मे । तापमानाचा उच्चांक दिवसेंदिवस वाढत आहे. ढगाळ वातावरण अन् उन्हाच्या तिव्र झळांनी जणू काही उष्णता वाढल्याचा अनुभव सध्या जळगावात येत आहे. यात मागील दोन दिवसात वाढलेल्या उष्णतेने जळगाव (Jalgaon) हे राज्यातील ‘हॉट सिटी’ ठरले आहे. (jalgaon news high temperature Jalgaon becomes hot city in the state)
उन्हाळा म्हणजे दरवर्षी जळगावचे (Temperature) तापमान ४३ अंशाच्या वर कायम असते. यंदा मात्र उष्णतेची लाट अधूनमधून येत असल्याने यंदाचा उन्हाळा असह्य होत आहे. कडक तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून, रात्री उशिरापर्यंत उन्हाच्या झळा जाणवत असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. सलग तीन दिवसांपासून जळगावातील तापमानाचा पारा हा ४५ अंशाच्या वर राहिला असून पुढील काही दिवस देखील ही स्थीती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कडक उन्हाचे चटके व यातून जाणवत असलेल्या उष्णतेपासून सध्या तरी दिलासा मिळणार नाही. मंगळवारी जळगावाचे तापमान ४५.८ अंश सेल्सीअस इतके नोंदविले गेले आहे. तिच स्थीती आज देखील कायम असून पुढील दोन– तीन दिवस असेल. जळगावनंतर (Akola) अकोल्यात देखील पारा ४५ अंशाच्या वर राहिला असून यानंतर नंदुरबार, औरंगाबाद, नागपूर शहरांचा समावेश आहे.
या आठवड्यात उन्हाच्या चटक्यांसोबत आभाळ देखील आले आहे. या उन सावल्यांच्या खेळात देखील उष्णता वाढली आहे. दिवसा तापत असलेल्या तापमानामुळे रात्री प्रचंड उकाडा होत आहे. यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.