महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी ।लक्ष्मण रोकडे । दि.११ मे । पिंपरी । यूपीए सरकारच्या काळात चारशे रुपयांमध्ये मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर मे २०२२ मध्ये एक हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीने महाग झाला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने, व नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीने केल्याने, जीएसटीची अंमलबजावणी आणि हुकूमशाही पद्धतीने सुरु असलेल्या केंद्रातील कारभारामुळे, वाढत्या महागाईमुळे देशातील सव्वाशे कोटी जनता त्रस्त झाली आहे. केंद्र सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष वाढला आहे. केंद्र सरकारचा रविवारी पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. गॅस सिलेंडरला हार घालून श्रद्धांजली वाहिली.