महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मे । जगात कोरोनाचा उद्रेक कमी झालाय परंतू चीन व इतर काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसतो आहे. भारतातही काही भागात कोरोनाने तोंड वर केल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोना रूग्णसंख्येत वाढ दिसून आल्याने राज्य सरकारने पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन केल आहे. मास्कचा वापर सरकारने अजूनही ऐच्छिक ठेवला असला तरीही गेल्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांना मास्क वापरा अशा सूचना राज्य सरकारद्वारे करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाचेही आवाहन
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना रूग्णांची आकडेवारील वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता धोका टाळण्यासाठी प्रवासात मास्क वापरावा असे आवाहन रेल्वे प्रशासनानेही केले आहे.