यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार : हवामान खात्याचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मे । यंदा मान्सून वेळेअगोदरच येण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. प्रत्येकवर्षी अंदमानमध्ये पाऊस २२ मेपर्यंत दाखल असतो. मात्र, यावर्षी पाऊस (rain) १३ ते १९ मे दरम्यान म्हणजे वेळेअगोदरच दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने (weather department) वर्तविले आहे. यानंतर २० ते २६ मेपर्यंत पाऊस केरळमध्ये (Kerala) दाखल होण्याची शक्यता आहे. तर तळकोकणामध्ये २७ मे ते २ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने पुढील ४ आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. पाऊस सुरु होण्याची तारीख हवामान खात्याकडून १५ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. अंदमानच्या समुद्रावर १३ ते १९ मे दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी अंदबारमध्ये मान्सून २२ मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र यंदा मान्सून वेळेच्या अगोदरच दाखल होणार आहे.

पुणे (Pune) हवामान खात्याचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट (Tweet) करत पावसाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात अंदमानानवर मान्सून दाखल होणार आहे. यानंतर दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर (Arabian Sea) पाऊस शक्यता आहे, आणि त्यानंतर पुढील आठवड्यात भारतात मान्सून दाखल होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *