KKR vs SRH Prediction Playing XI IPL 2022: KKR साठी आजही करो या मरो, श्रेयस अय्यर कोणाला संधी देणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे । कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) संघ यंदाच्या 15 व्या सीजनमध्ये नव्या कर्णधारासह मैदानावर उतरला होता. मागच्यावर्षीचा उपविजेता संघ आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला नाही. आता केकेआरला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर उर्वरित सगळे सामने जिंकावेच लागतील. श्रेयस अय्यरच्या (Shreyas iyer) नेतृत्वाखाली केकेआरला दोन सामने खेळायचे आहेत. या दोन्ही सामन्यात विजयापेक्षा कमी काही चालणार नाही. कोलकात्याचा शनिवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामना होणार आहे. हैदराबादची स्थिती कोलकातापेक्षा थोडी चांगली आहे. पण अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना सुद्धा संघर्ष करावा लागेल. पॉइंटस टेबलमध्ये हा संघ सहाव्या स्थानावर आहे. केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या SRH चे अजून तीन सामने बाकी आहेत. प्लेऑफसाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. पण त्यासाठी योग्य प्लेइंग 11 (KKR vs SRH Playing 11) निवडणं जास्त महत्त्वाचं आहे.

KKR ने केले होते पाच बदल
पॉइंटस टेबलमध्ये सातव्या स्थानावर असलेल्या कोलकाताना मागच्या काही सामन्यात मोठे बदल केले आहेत. मागच्या सामन्यात केकेआरने पाच बदल केले होते. त्यांना विजय सुद्धा मिळाला होता. केकेआरने मुंबई इंडियन्सवर 52 धावांनी विजय मिळवला होता. हैदराबाद विरुद्धची अशीच कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

पॅट कमिन्सची जागा कोण घेणार?
कोलकाताला आज होणाऱ्या सामन्याआधी मोठा झटका बसला आहे. पॅट कमिन्स दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. कमिन्सला हिप इंजरी आहे. केकेआरने कमिन्सला फक्त सात सामन्यात संधी दिली होती. त्याच्या जागेवर उमेश यादव खेळू शकतो. उमेश यादव दुखापतीमुळे मागचे काही सामने खेळू शकलेला नाही. उमेश खेळला नाही, तर शिवम मावी, हर्षित राणाला संधी मिळू शकते.

मार्को जॅनसेन पुनरागमन करणार?
केन विलियमसनने मागच्या काही सामन्यात मार्को जॅनसेनला संधी दिलेली नाही. आजच्या सामन्यात तो पुनरागमन करु शकतो. मागच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या फझल फारुखीला संधी दिली होती. त्याने डेब्यु केला होता. जॅनसेनचा प्लेइंग 11 मध्ये समावेश झाला, तर फारुखीला बाहेर बसावे लागेल. नटराजनच्या दुखपतीबद्दलही स्थिती स्पष्ट नाहीय. तो खेळला, तर हैदराबादचा फायदा आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

SRH – केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, जगदीश सुचित, शशांक सिंह, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, फजलहक फारुखी,

KKR – श्रेयस अय्यर (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शेल्डन जॅक्सन, उमेश यादव/शिवम मावी/हर्षित राणा, सुनील नरेन, टिम साउदी, वरुण चक्रवर्ती,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *