Andrew Symonds : अवघं क्रिकेट विश्व अँड्र्यू सायमन्ड्सच्या मृत्यूनं हळहळलं ; सायमन्ड्स मूळचा कॅरेबियन? मग ऑस्ट्रेलियासाठी कसा खेळला?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । अवघं क्रिकेट विश्व अँड्र्यू सायमन्ड्सच्या अपघाती मृत्यूनं (Andrew Symonds Died) हळहळलंय. शनिवारी रात्री अँड्र्यू सायमन्ड्सच्या (Andrew Symonds car accident) कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अँड्र्यू सायमन्ड्सचा मृत्यू झाला. वयाच्या 46व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतलाय. आपल्या वादळी खेळी मॅच एकहाती जिंकून देण्याची (Andrew Symonds match winner) क्षमता अँड्र्यू सायमन्ड्समध्ये होती. आपल्या फिरकी गोलंदाजीनं त्यानं ऑस्ट्रेलियन संघाला अनेकदा अडचणीतून बाहेर काढलंय. एकापेक्षा एक झेल टिपत त्यांना फिल्डिंगही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली होती. याच अँड्र्यू सायमन्ड्स बद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. एखाद्या वेस्ट इंडियन क्रिकेटर सारखा दिसणारा अँड्र्यू सायमन्ड्स ऑस्ट्रेलियासाठी खेळत होता. तो मूळचा वेस्ट इंडिजचाच होता का? क्रिकेटसोबत तो मनमुराद जगला. वेगवेगळ्या वादात तो राहिला. ओठाला सफेद रंग लावून खेळणाऱ्या अँड्र्यू सायमन्ड्सला विसरणं अशक्य आहे. तो आज आपल्यात नाही, यावर अनेकांना विश्वास बसत नाही. याच अँड्र्यू सायमन्ड्सच्या खास गोष्टी चकीत करायला लावणाऱ्या आहेत.

 

अँड्र्यू सायमन्ड्स मूळचा कॅरेबियन?
अँड्र्यू सायमन्ड्सला खरंतरत एका इंग्लंडमधील दाम्पत्यानं दत्तक घेतलं होतं. अगदी लहान असताना एका इंग्लंडमधील दाम्पत्यानं त्याला आपल्या घरी आणलं. तो मूळचो कॅरेबियन असल्याचा दावा क्रिकेट कंन्ट्री या वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टमध्ये आढळतो. दरम्यान, सायमन्ड्सला दत्तक घेतल्यानंतर हे दाम्पत्य नंतर ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यासाठी गेलं आणि तिथेच स्थायिक झालं.

मग ऑस्ट्रेलियासाठी कसा खेळला?
आता इंग्लंडमधील दाम्पत्यानं त्याला दत्तक घेतलं, म्हणजे तो इंग्लंडचा झाला का? नाही! फर्स्ट क्लास क्रिकेट एन्ड्र्यू सायमन्ड्स ऑस्ट्रोलियाकडूनच खेळला. 1994-95 मध्ये इंग्लंडच्या विरुद्धच त्यानं 108 धावा केल्या होत्या. 16 सिक्स लावून त्यानं आपल्या सुरुवातीच्या टप्प्यात वादळी खेळीनं सगळ्यांना चकीत केलं होतं.

सुरुवातीला त्याच्याकडे इंग्लंडचं पासपोर्ट होतं. त्यामुळे तो इंग्लंडकडून खेळू शकतो का, यावरुनही चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आयसीसीनं याबाबत स्पष्ट निर्णय घेतला.

फर्स्ट क्लास क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून खेळल्यामुळे त्यानं ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून खेळलो तर मी माझ्या प्रेयसीला, ऑस्ट्रेलियातील मित्रांना आणि कुटुंबाला दगा दिल्यासारखं होईल, असं तो म्हणाला होता. अँड्र्यू सायमन्ड्स हा ऑस्ट्रेलियाचा कट्टर खेळाडू होता, हे त्याच्या मैदानातील देहबोलीतून स्पष्टपणे जाणवायचं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *