शरद पवारांविरोधात पोस्ट करणं केतकीला भोवलं, 18 मे पर्यंत पोलिस कोठडी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. शनिवारी केतकीला अटक करण्यात आली. शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे केतकीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे केतकीला शरद पवारांविरोधात पोस्ट करणं महागात पडलं आहे.

ठाणे कोर्टाचे न्यायाधीश वी. वी. राव -जडेजा यांच्यासमोर केतकी केसची सुनावणी झाली. केतकी चितळे हिला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी केतकी हिने केलेल्या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याचे सांगितले.

केतकी हिने वकील घेतला नाही. तिने स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. तर, ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली. यावेळी न्यायालयाने तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *