सायमंड्सची कोणती एकमेव इच्छा अपूरी राहीली, जाणून घ्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टैपलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सचे शनिवारी रात्री एका कार अपघातामध्ये निधन झाले. या घटनेने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली. पण आता सायमंड्सची फक्त एकच अशी इच्छा होती, जी त्याला आतापर्यंत पूर्ण करता आली नव्हती. सायमंड्सची पत्नी लॉरेनने यावेळी एक मोठा खुलासा केला आहे.

सायमंड्स हा मनमौजी माणूस होता. त्यामुळे त्याने आपल्या खासगी आणि व्यावयासिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी मनासारख्या केल्या होत्या. पण फक्त एकच गोष्ट त्याची करायची राहून गेली आणि याचा खुलासा त्याच्या पत्नीने आता केला आहे. लॉरेन म्हणाली की, ” जसं लोकं समजत होती, तसा सायमंड्स नक्कीच नव्हता. क्रिकेटचे त्याच्याकडे जबरदस्त ज्ञान होते. तो खेळ आणि खेळाडूंबद्दल माझ्याशी बरंच बोलायचा. मला सुरुवातीला क्रिकटमधलं काहीच समजायचं नाही. पण त्याने अशा सोप्यापद्धतीने मला सांगितलं की, मलादेखील हा खेळ समजायला लागला. त्याने आयुष्यात मनाला वाटेल त्या बऱ्याच गोष्टी केल्या, पण एक गोष्ट करायची त्याची राहून गेली. तो कधीच विद्यापीठात शिकण्यासाठी गेला नाही आणि कोणतीही डीग्री तो मिळवू शकला नाही. या गोष्टीची सल त्याच्या मनात कायम होती. तो मला नेहमीच सांगयचा की, ‘मी विद्यापीठात कधीही जाऊ शकलो नाही, डिग्री घेऊ शकलो नाही आणि ही गोष्ट नेहमीच मला स्वस्थ बसू देत नाही.’ पण त्याच्याकडे डिग्री नसली तरी तो एक बुद्धिमान व्यक्ती होता. त्याला खरंच कोणत्या डीग्रीची गरज नव्हती. पण ही गोष्ट अखेरपर्यंत त्याच्या मनात कायम राहीली होती.”

सायमंड्स हा ऑस्ट्रेलियासाठी एक उपयुक्त खेळाडू होता. कारण कधीही गरज पडली तर तो संघासाठी उभा राहायचा आणि संघाला यशही मिळवून द्यायचा. सायमंड्सला रॉय या नावाने हाक मारली जायची. आक्रमक फलंदाजीसोबत तो मध्यम गतीने आणि फिरकी गोलंदाजी देखील करायचा. १९९८ ते २००९ या काळात २६ कसोटी, १९८ वनडे आणि १४ टी-२० सामने खेळले. ऑस्ट्रेलियाच्या २००३ आणि २००७च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील तो महत्त्वाचा सदस्य होता. हे दोन्ही त्याच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण होते. त्याच्या आयुष्यात बऱ्याच वादग्रस्त गोष्टीही घडल्या होत्या. पण नेहमीच तो त्यामधून बाहेर आला आणि संघासाठी त्याने भरूव योगदान दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *