दिलासा मिळणार का? सीएनजीचे दर कमी होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । सीएनजीचे (CNG Price) दर महाग झाल्याने अनेक वाहनधारकांचे आर्थिक बजेट बिघडले आहेत. मात्र, सीएनजीधारक वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसांत सीएनजीचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅसचे वितरण करणाऱ्या कंपनीच्या खर्चात घट झाली आहे. त्यामुळं सीएनजीच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली होती. गेल्या दोन महिन्यात १२वेळा सीएनजीच्या दर वाढले आहे. दिल्लीत ७३.६१ रुपये प्रति किलोग्रॅम सीएनजी आहे. तर, गेल्या एका वर्षात सीएनजीत ३०. २१ रुपये प्रति किलोग्रॅम म्हणजेच ६० टक्के वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत यात ५-६ रुपयांपर्यंत घट होऊ शकते.

सरकारी कंपनी गेल (GAIL)मे महिन्यात सिटी गॅस कंपनींना ८.०४ डॉलर प्रति एमएमबीटीयूच्या दरानुसार गॅसचा पुरवठा करेल. हा पुरवठा घरगुती आणि वाहतूकीसाठी असेल. यामुळं कंपनीना सीएनजीच्या किमतीत ५-६ रुपये प्रति किलो घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती तज्ञ्जांनी दिली आहे. तसंच, ही कपात ऑपरेटर टू ऑपरेटर अशी असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सिटी गॅस कंपनी ६.१० डॉलरच्या दरानुसार घरगुती गॅसची खरेदी करते. या हिशोबाने गेलच्या गॅसची किंमत अधिक आहे. मात्र, आयात करण्यात येणाऱ्या गॅसच्या तुलनेने कमी आहे. देशात सीएनजीची मागणी वाढतेय आणि घरगुती गॅसची मागणी पुर्ण होऊ शकत नाहीये. त्यामुळं या कंपन्यांना गॅस आयात करावा लागत आहे. गेल्या गेल्या आठ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये गॅसच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. सध्या याची किंमत २२ डॉलर प्रति एमएमबीटीयू इतकी आहे.

तसंच, ज्या कंपन्या जास्त गॅस आयात करतात त्यांना गेलच्या तुलनेने जास्त फायदा होतो. काही कंपन्यां १० ते १५ टक्क्यांपर्यंत आयात करतात. आता सीएनजीच्या किमतीत तेजी आल्यामुळं बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आयात खर्चावर अवलंबून असल्यानं गेल कंपनी १५ दिवस किंवा महिन्यातून किंमतीत सुधार करेल. सरकारने नुकतेच गॅस वाटप धोरणात बदल केला आहे. त्यानुसार, गेलला (GAIL)देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय किमतींवर आधारित समान मिश्रित किमतीत गॅसचा पुरवठा करावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *