Repo rate : महागाईवर नियंत्रण मिळणार का ?; आरबीआय ऑगस्टमध्ये पुन्हा रेपो रेट वाढवणार?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून (RBI) काही दिवसांपूर्वीच रेपो रेटमध्ये (Repo rate) वाढ करण्यात आली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये 40 बेसीस पॉइंटची वाढ केली आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेपो रेट वाढवण्यात आल्याचे स्पष्टीकरण आरबीआयच्या वतीने देण्यात आले आहे. दरम्यान आरबीआकडून रेपो रेट वाढवण्यात आले, यामागे प्रमुख कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये (Ukraine) सुरू असलेले युद्ध असल्याचे मत देशातील प्रमुख अर्थशास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आले आहे. एवढेच नाही तर आरबीआय येत्या ऑगस्टपर्यंत रेपो रेटमध्ये आणखी वाढ करू शकते असे मत देखील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार येत्या ऑगस्टमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये आणखी 0.75 टक्क्यांची वाढ करू शकते. रेपो रेट 0.75 टक्क्यांनी वाढवल्यास रेपो रेट हे कोरोनापूर्व स्थितीमध्ये म्हणजेच 5.15 टक्क्यांवर पोहोचतील.

महागाई कमी होणार?
आरबीआयकडून काही दिवसांपूर्वीच रेपोच्या दरात 40 बेसीस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे. देशात वाढत असलेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो रेट वाढवण्यात आल्याचे आरबीआयने सांगितले. मात्र रेपो रेट वाढवण्यामुळे सर्वच प्रकारचे ईएमआय महाग झाले आहेत. तसेच सध्या वाढत असलेली महागाई ही मागणी वाढल्यामुळे निर्माण झालेली नाही, तर वस्तुंच्या तुटवड्यामुळे निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यास महागाई आणखी वाढू शकते असा अंदाज देखील अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ऑगस्टमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता
देशात सध्या महागाई वाढत आहे, माहागाई कमी करण्यासाठी आरबीआयच्या वतीने येत्या ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्यात येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आरबीआयकडून येत्या ऑगस्टमध्ये रेपो दरात 0.75 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. ऑगस्टमध्ये रेपो दरात 0.75 टक्क्यांची वाढ केल्यास रेपो दर 5.15 टक्क्यांवर पोहोचलीत. म्हणजेच रेपो रेट हे कोरोना पूर्व काळातील स्थिती गाठतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *