महाराष्ट्र 24- देहूरोड । प्रतिनिधी । येथील वडिलोपार्जित शेतजमिनीवर 7 एक जण एकत्र येऊन, दहशत माजवून अंध व्यक्तीला धमकावत त्याच्या शेतात विना नंबर प्लेटचा ट्रॅक्टर चालवून नांगरणी करत अतिक्रमण केल्याची संतापजनक घटना देहूरोड येथील चिंचोली गावात घडली आहे.
या गावगुंडाची वाढती दहशत पाहून अंध दिनकर रामचंद्र गायकवाड यांनी गुन्हेगारांन विरुद्ध 1 जानेवारी 2020 रोजी या संदर्भात देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मात्र 3 एप्रिल रोजी पुन्हा एकदा याच लोकांनी 13, 14 जणांना सोबत घेऊन दिनकर गायकवाड यांना दमदाटी करून त्यांच्या जमिनीवर ट्रॅक्टर चालवला. सध्या देशभर लॉक डाऊन सुरू असून कलाम 144 संचार बंदी लागू असूनही, शासनाचे सर्व नियम धाब्यावर धरत एकत्र जमाव करत गायकवाड त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. यामुळें परिसरात संताप व्यक्त होत असून संबंधितांवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी होत आहे.