मान्सूनचा खोळंबा; पावसाला विलंब ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ मे । मान्सून देशात दाखल होण्यास आता विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मान्सून श्रीलंकेच्या वेशीवरच खोळंबला आहे. त्यामुळे २७ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होणार, हा हवामान विभागाचा अंदाज हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सून अजूनही श्रीलंकेच्या वेशीवरच असल्याने मान्सून उशीरा भारतात पोहोचणार आहे. (Monsoon Updates)

आज सकाळी आणि पहाटे मुंबईच्या काही भागात पावसाच्या काही सरी बरसल्या. पण याला मान्सून म्हणता येणार नाही, तो मान्सूनपूर्व पाऊसच होता. कारण मान्सून गेल्या तीन दिवसांपासून श्रीलंकेच्या किनारपट्टीसह परिसरात अडकला आहे. त्यामुळे मान्सून २७ मे रोजी भारतात दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज (Weather Updates) चुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात पोहोचेल. पण तरीही यंदाचा मान्सून सकारात्मक राहणार आहे. ज्या अर्थी मान्सून वेळेच्या आधीच देशात दाखल होणार आहे, त्या अर्थी यंदा पाऊस चांगला राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *