केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी अर्ज करणार

Spread the love

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२४ मे । अभिनेत्री केतकी चितळेच्या न्यायालयीन कोठडीत आता आणखी वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच रबाळे पोलीस स्थानकात तिच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात आता केतकी चितळे जामीन अर्ज दाखल करणार आहे. आत्तापर्यंत तिच्या विरोधात दाखल झालेल्या एकाही गुन्ह्यामध्ये तिला जामीन मिळालेला नाही. याच अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात केतकीला ठाण्यातल्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता तिला ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे प्रकरण २०२० मधल्या पोस्टबद्दलचं आहे. पण नुकतंच आता शरद पवारांबद्दल तिने जी पोस्ट केली होती, त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यातही तिला अजून दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणात सुनावणी पूर्ण झाली असून २६ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *