Anil Parab : अनिल परब ईडीच्या रडारवर ! 7 ठिकाणी ईडीची छापेवारी ; गुन्हा दाखल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ मे । अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीकडून (ED) आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे. सात ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच ईडीने अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मनी लॉंन्ड्रींग विरोधात केस दाखल केली आहे. मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे अनिल परबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्य बजावून चौकशीसाठी बोलावू शकतं. याच्या आगोदर देखील अनिल ईडीने चौकशी केली आहे. तसेच त्यांच्यासोबत आरटीओच्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *