![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ मे । भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price) साप्ताहिक घट झाली आहे आणि चांदी महाग झाली आहे. या व्यापार सप्ताहात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 113 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात (Silver Price) 332 रुपयांची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (23 ते 27 मे) 24-कॅरेट सोन्याचा दर 51,317 होता, जो शुक्रवारपर्यंत 51,204 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 62,206 रुपयांवरून 62,538 रुपये प्रति किलो झाली आहे.
गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले?
>> 23 मे 2022- रुपये 51,317 प्रति 10 ग्रॅम
>> 24 मे 2022- रुपये 51,292 प्रति 10 ग्रॅम
>> 25 मे 2022- रुपये 51,172 प्रति 10 ग्रॅम
>> 26 मे 2022- 50,945 रुपये प्रति 10 ग्रॅम
>> 27 मे 2022- रुपये 51,204 प्रति 10 ग्रॅम
गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला?
>> 23 मे 2022- रुपये 62,206 प्रति किलो
>> 24 मे 2022- रुपये 61,711 प्रति किलो
>> 25 मे 2022- रुपये 61,448 प्रति किलो
>> 26 मे 2022- रुपये 61,605 प्रति किलो
>> 27 मे 2022- रुपये 62,538 प्रति किलो