IPL 2022 Final, GT vs RR: अंतिम सामन्यात कोणासाठी अनुकूल असेल खेळपट्टी? पाहा पिच रिपोर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ मे । गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात (Gujarat Titans vs Rajasthan Royals) आज आयपीएल 2022 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांसमोर येणार आहेत. अंतिम सामन्यात दवाचा प्रभाव जाणवणार? कोणासाठी अनुकूल खेळपट्टी असेल? हे जाणून घेण्यासाठी पिच रिपोर्ट (Pitch Report) आणि हवामानाचा अंदाज (Weather Forecast) जाणून घेऊयात.

वेगवान गोलंदाजांना मदत
स्टेडियममध्ये पाच काळ्या मातीच्या आणि सहा लाल मातीच्या खेळपट्ट्या आहेत. लाल मातीच्या खेळपट्ट्यांपेक्षा काळ्या मातीच्या खेळपट्ट्यांवर चांगला बाऊन्स मिळतो. काळ्या मातीच्या खेळपट्ट्या लवकर सुकतात आणि फिरकीपटू किंवा संथ गोलंदाजांना मदत करतात. क्वालिफायर 2 मध्ये हे दिसले नसले तरी येथे वेगवान गोलंदाजांनी जास्त विकेट घेतल्या आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर धावा करणं खूप सोपं आहे. चांगली खेळपट्टी आणि वेगवान आउटफिल्ड म्हणजे फलंदाज काही चांगले फटके खेळू शकतात.

अहमदाबादमध्ये रविवारी अंतिम सामन्याच्या दिवशी कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस असू शकते. तर, किमान तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील आणि रात्री तापमानात घट होऊ शकते. आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात पावसाचा धोका नाही. परंतु, येथे ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जनं चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतर कोलकात्याचा क्रमांक लागतो. कोलकात्यानं आतापर्यंत दोनदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्यानंतर डेक्कन चार्ज हैदराबाद आणि सनरायसर्स हैदराबाद दोन्ही संघानं प्रत्येकी एक-एक वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर, आयपीएलच्या पहिल्याच हंगामात शेन वार्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघानं आयपीएलची ट्रॉफी उचलली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *